इचलकरंजीत १२ फेब्रुवारीपासून गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर व्याख्यानमाला
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन उपक्रम २०२५ अंतर्गत गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर व्याख्यानमाला यंदा १७ व्या वर्षात साजरी होत आहे. १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे सायंकाळी ६:०० ते ८:०० या वेळेत ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील नामवंत मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे ‘मी आणि विनोद’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. दुसऱ्या दिवशी प्रा. डॉ. विनोद बाबर ‘यशाचा शिवमंत्र’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देतील. तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर ‘बाई कुठे काय करते…’ या विषयावर स्त्री भूमिकांबाबत विचार मांडतील. शेवटच्या दिवशी प्रसिद्ध योगाचार्य संगु गुरुजी ‘आनंदी जीवन जगण्याची कला’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
मा. मकरंद अनासपुरे हे (प्रसिद्ध अभिनेते) अभिनेय आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांचे विनोदाचा प्रवास आणि सामाजिक बांधिलकी यावर मनोगत असणार आहे. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव कार्य केले आहे.
मा.प्रा. डॉ. विनोद बाबर (प्रसिद्ध व्याख्याते) पत्रकार अर्थतज्ज्ञ आणि प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर आपल्या व्याख्यानात यशस्वी जीवनाचे मंत्र सांगणार आहेत. त्यांनी १२०० हून अधिक प्रेरणादायी व्याख्याने दिली आहेत.
मा. मधुराणी गोखले-प्रभुलकर अभिनेत्री असून ‘आई कुठे काय करते’फेम अभिनेत्री,कवी आणि संगीत दिग्दर्शिका मधुराणी गोखले-प्रभुलकर स्त्रीच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या याविषयी विचार मांडणार आहेत.
मा. संगु गुरुजी हे सुप्रसिद्ध योगाचार्य आणि निसर्गोपचारतज्ज्ञ संगु गुरुजी आनंदी जीवनासाठी योग, ध्यान आणि नैसर्गिक उपचार यांचे महत्व पटवून देणार आहेत.
व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी खा.धैर्यशील माने,आ.राहुल आवाडे,जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित राहणार आहेत.
ही व्याख्यानमाला जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी असून, श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, शहरवासीयांसाठी विनामूल्य असून, नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी महानगरपालिकेच्या अति. आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे (कोल्हे) यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी उपायुक्त स्मृती पाटील,सहा आयुक्त रोशनी गोडे,नगरसचिव विजय राजापूरे,टागोर वाचनलाय प्रमुख बेबी नदाफ,लेखाधिकारी विकास खोळपे,जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800