इचलकरंजी मध्ये शुक्रवारी प्रथमच मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर
इचलकरंजी
अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर व नारायणी हॉस्पिटल, इचलकरंजी यांच्या वतीने दिनांक १४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी ११ ते १ ह्या वेळेत नारायणी हॉस्पिटल, त्रिपाठी कुरियर शेजारी, भगतसिंग बागे समोर, थोरात चौक, इचलकरंजी येते विनाऑपरेशन मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे, पाय सुजणे,संध्याकाळी पाय दुखणे,पायामध्ये असहजता निर्माण होणे,असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे,पायाच्या पोटऱ्या दुखणे,पायाच्या नसा निळ्या होणे,पायाच्या नसा फुगीर होणे अशी लक्षणे असलेली रुग्ण सहभागी होऊ शकतात,व्हेरिकोज व्हेन्स हा आजार पुरुषापेक्षा महिला मध्ये जास्त प्रमाणात असतो जसे की गर्भधारणा, रजोनिवृत्ती ह्या काळात जास्त प्रमाण असते,पॉवरलूम वर जास्त वेळ उभे राहून काम करणारे कामगार,प्रमाणापेक्षा जास्त वजन असणे,ड्राइवर, कंडक्टर, नाभिक, किराणा दुकानदार, इस्त्री व्यवसायक ह्यांना व्हेरिकोज व्हेन्स आजरा जास्त प्रमाणात दिसून येतो, शिबिरास येताना आपले आधार कार्ड व रेशन कार्ड व पायाचा व्हेनस कलर डॉपलर करून घेऊन येणे आवश्यक आहे, अत्याधुनीक लेसर द्वारे उपचार असल्यामुळे फक्त १ दिवस हॉस्पिटल मध्ये थांबावे लागते, हे शिबीर इचलकरंजी मध्ये प्रथमच असून जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या शिबीरच लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, बसवराज कडलगे व मदन गोरे यांनी केले आहे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800