ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील जैन मंदिरात चोरी; ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील जैन मंदिरात चोरी; ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

इचलकरंजी:

येथील पाटील मळा, बिग बाजार रोड येथे असलेल्या सुमतीनाथ जैन मंदिरात मध्यरात्री चोरीची घटना घडली. दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दानपेट्या फोडून रोख रक्कम व चांदीच्या वस्तू चोरून नेल्या.

चोरीची घटना रविवारी मध्यरात्री १ ते ३.३५ च्या दरम्यान घडली.तक्रारदार नरपतलाल मुलचंद सोलंकी (वय ६१, रा. चंपा नगर कॉलनी, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेट्यांमधून अंदाजे २० हजार रुपये रोख व १५ हजार रुपये किंमतीच्या सहा चांदीच्या वाट्या (६०० ग्रॅम) आणि पूजा साहित्य चोरून नेले. एकूण ३५,०००रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.

चोरट्यांचे मंदिरे लक्ष

इचलकरंजी शहरात यापूर्वीही बऱ्याच मंदिरात चोऱ्या झाल्या असून याबाबत काही मंदिरांच्या पदाधिकारी यांनी गुन्हे नोंद केले याबाबत काही गुन्हे उघडकीस पण आले होते.आज येथील जैन मंदिरात चोरी झाली असली तरी बाजूचे बालाजी मंदिराचीही कुलपे चोरट्याने तोडली असून आतमध्ये त्याना प्रवेश करता आला नाही.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा