डॉ.चैताली मगदुम यांना इंडियन डेंटल
असोसिएशनचा बेस्ट प्रेसिडेंट राष्ट्रीय पुरस्कार
इचलकरंजी :
येथील डॉ.चैताली मगदुम यांना २०२४ साठी इंडियन डेंटल असोसिएशन मुख्यालयकडून देशातील लोकल ब्रँचचा “बेस्ट प्रेसिडेंट” या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चेन्नई येथे भरविण्यात आलेल्या अखिल भारतीय ७५ व्या दंतपरिषदेमध्ये, इंडियन डेंटल असोसिएशन चे नॅशनल अध्यक्ष डॉ. रविंद्रनाथ (केरळ), हॉनररी सेक्रेटरी जनरल डॉ.अशोक ढोबळे (मुंबई), माजी अध्यक्ष डॉ. राजीवकुमार (नवी दिल्ली) यांच्या हस्ते, तसेच डॉ सुभ्रा नंदी (कोलकत्ता) यांच्या उपस्थिती मध्ये डॉ. चैताली मगदूम यांनी हा पुरस्कार स्विकारला. या दंतपरिषदेमध्ये देशभरातून २५०० दंतरोगतज्ञांनी भाग घेतला होता. सर्व राज्य शाखेचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
याचबरोबर इंडियन डेंटल असोसिएशन इचलकरंजी शाखेला “बेस्ट बेस्ट रुरल एक्टिव्हिटी ” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार इचलकरंजी शाखेच्या अध्यक्षा डॉ. चैताली मगदूम, सेक्रेटरी डॉ. दीपा चौगुले,खजिनदार डॉ.प्रियंका जाधव यांनी स्विकारला,
“बेस्ट प्रेसिडेंट राष्ट्रीय पुरस्कार” व “बेस्ट बेस्ट रुरल अक्टिव्हिटी पुरस्कार” असे वैयक्तिक आणि सामुहिक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होण्याची वेळ इचलकरंजी शाखेची पहिली वेळ आहे.
इचलकरंजी शाखेच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी २०२४ मध्ये वर्षभर नियोजनबध्द काम करीत आपला एक वेगळा ठसा उमठवीला. नोव्हेबर २०२४ मध्ये नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय दंतपरिषदेतही “डॉ वसंत कोटक समृती चषक” या पुरस्काराने इचलकरंजी शाखेला गौरविण्यात आले होते. डेंटल असोसिएशन इचलकरंजी शाखेच्या अध्यक्षा डॉ. चैताली मगदूम व पदाधिकारी यांनी वर्षभर ठिकठिकाणी शालेय दंततपासणी शिबिरे घेतली. अनेक गरजू रुग्णांवर उपचार केले. विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातुन अनेक रुग्णांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन व मोफत तपासणी शिबीरे घेतली. तसेच अनेक प्रबोधनात्मक व्याख्यानेही या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
अनाथालय आणि सामाजिक संस्थामध्ये मुंलांची तपासणी करण्यात आली डॉ. चैताली मगदुम यांनी निरनिराळ्या ठिकाणी दंत समुपदेशन व दंत आरोग्य प्रबोधन पर व्याख्याने दिली आणि समाजामध्ये मौखिक आरोग्य कसे चांगले राहील याबाबत जनजागृती त्यांनी केली.तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील दंतवैदयकांसाठी दोन दिवसाची विभागीय दंत परिषदेचे अत्यंत प्रभावीपणे आयोजन केले. याचेही कौतुक झाले होते. या विभागीय परिषदेच्या आयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ.चैताली मगदूम व सचिव डॉ दीपा चौगुले या होत्या. या परिषदेसाठी पुणे, सातारा , कराड, कोल्हापुर, सांगली,बेळगाव, रत्नागीरी गडहिंग्लज इत्यादी ठिकाणाहुन ३०० दंतवैद्यकीय सहभागी झाले होते.इचलकरंजी शाखेने डॉ. चैताली मगदूम यांच्या नेतृत्वाखाली अथक परिश्रम करून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्याची दखल चेन्नई येथील राष्ट्रीय परिषदेमध्ये घेण्यात आली.
इचलकरंजी च्या तीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा राष्ट्रीय पुरस्कार डॉ.चैताली मगदूम यांना मिळाला. त्यांना येथील सिनिअर डॉक्टर डॉ. रविंद्र कोठारी व डॉ. महेंद्र शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळ : १)येथील डॉ.चैताली मगदुम यांना २०२४ साठी इंडियन डेंटल असोसिएशनने “बेस्ट प्रेसिडेंट” या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. दुसऱ्या छायाचित्रात
बेस्ट बेस्ट रुरल एक्टिव्हिटी ” पुरस्कार स्वीकारताना डॉ. चैताली मगदूम, डॉ. दीपा चौगुले, डॉ.प्रियंका जाधव.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800