जेसीबीने धडक देऊन पती-पत्नी जखमी;माजी नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा दाखल
शहापूर
यड्राव ते कोरोची रोडवरील मलाबादे चौकाजवळ झालेल्या अपघातात एका जेसीबीने रिक्षाला धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाले आहेत. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्निल मारुती पाथरवट (रा. सांगली रोड, पाटील मळा, इचलकरंजी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन गणपती कांबळे (वय ४४, व्यवसाय – कांदा बटाटा विक्रेता, रा. साखर कारखाना कबनूर, वाकरेकर मळा, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते मंगळवारी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या MH 10 Z 5320 क्रमांकाच्या अॅपे रिक्षाने प्रवास करत होते.त्यावेळी आरोपीने त्याच्या MH 09 FJ 9759 क्रमांकाच्या जेसीबी वाहनास भरधाव वेगाने चालवून समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी व त्यांच्या पत्नी सुनिता सचिन कांबळे किरकोळ व गंभीर जखमी झाले.अपघातानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800