अर्थसंकल्प प्रतिक्रिया-सुभाष मालपाणी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांनी आज अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पामधून दहा हजार महिलांना सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांना ए आय चे प्रशिक्षण देऊन नवीन तांत्रिक क्षेत्रात महिलांचे आगमन.
शेतकऱ्यांना कृषी पंपस मोफत वीज देण्याचा संकल्प करून आर्थिक बचत केली आहे तसेच तालुकास्तरावर बाजारपेठ ची निर्मिती करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य ते भाव व बाजारपेठ मिळणे सोयीचे होणार आहे. महाराष्ट्र राज्यात नवीन सात राष्ट्रीय व्यापारी पेठची स्थापनाकरत असल्यामुळे व्यापाऱ्यांना त्याचबरोबर महिला बचत गट यांना चांगल्या प्रकारे व्यापार मध्ये सहकार्य होणार आहे. महाराष्ट्र राज्यात 50 लाख लोकांना रोजगार देण्याचे योजना जाहीर केली आहे ती महत्वपूर्ण आहे. तसेच ज्या उद्योजकांना व व्यापाऱ्यांना कर बाबत नवीन धोरण जाहीर केले आहेत त्यामुळे त्यांचे प्रलंबित प्रश्न करा संबंधीचे निकाली निघणार आहेत.
महाराष्ट्र राज्याचे नवीन औद्योगिक धोरण मधूनही अनेक लाभ उद्योजकांना देण्याचे प्रयत्न होणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्प मधून राज्यातील महिलावर्ग व तरुण पिढीला त्याचबरोबर शेतकरी यांना भविष्यात चांगला फायदा होणार आहे.
सुभाष मालपाणी प्रदेशाध्यक्ष उद्योग विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800