मा.मंत्री प्रकाश आवाडेंच्या वाढदिवसानिमित्त लाकूड ओढणे स्पर्धेत यश बेलेकर व गुरुनाथ मेस्त्री यांचे यश,बक्षिस वितरण संपन्न
इचलकरंजी
माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इचलकरंजी बेंदूर कमिटी व आवाडे समर्थक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या स्पर्धेत मोठ्या गटात यश बेलेकर तर लहान गटात गुरुनाथ मेस्त्री यांच्या बैलाने प्रथम क्रमांक पटकविला.
इचलकरंजीत संस्थान काळापासून लाकूड ओढण्याच्या स्पर्धा भरविल्या जात आहेत. दरवर्षी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा घेतल्या जात आहेत. डीकेटीई नारायण मळा प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते मैदानाचे पुजन करुन करण्यात आले. स्पर्धेत मोठ्या गटात 14 तर लहान गटात 10 स्पर्धक सहभागी झाले होते. मैदान पाहण्यासाठी तरुणांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या स्पर्धेत यश बेलेकर (प्रथम), अण्णासो परीट (द्वितीय) तर अरविंद कोळेकर (तृतीय) यांच्या बैलाने तर दोन दाती गट (लहान गट) गुरुनाथ मेस्त्री (प्रथम), प्रशांत सुर्वे (द्वितीय), श्रीवर्धन लवटे (तृतीय) यांच्या बैलांनी क्रमांक मिळविले. स्पर्धेनंतर कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे आणि जवाहर कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते, अहमद मुजावर, सुभाष जाधव, परवेझ गैबान, नंदू पाटील, राजू बचाटे, नरसिंह पारिक, राहुल घाट, किशोर पाटील, तानाजी भोसले, सागर गळतगे, दत्ता शेळके, विजय माळी, बबलु सुतार, इरफान अत्तार, शिवाजी काळे, बाबू रुग्गे, शिवाजी माळी, राजू कोरे, प्रकाश चौगुले, सागर कम्मे यांच्यासह शर्यतप्रेमी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800