प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे इचलकरंजी येथे दर्शन आणि सत्संगाचे गुरुवारी आयोजन
इचलकरंजी
महंमद गझनीने १०२६ साली सोमनाथ ज्योतिर्लिंगावर यशस्वी आक्रमण केले होते. परंतु, मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे अंश स्थानिक पुजाऱ्यांनी सुरक्षित ठेवले होते. हे अंश शेकडो वर्षे गुप्त ठेवून त्यांच्या पूजेचा परंपरा अखंड सुरू राहिली. १९२४ साली हे अंश कांची शंकराचार्य यांना दाखवण्यात आले. त्यांनी हे अंश १०० वर्षे अधिक काळ सुरक्षित ठेवून, २०२४ मध्ये श्री श्री रविशंकर यांच्याकडे पुनःस्थापनेसाठी देण्याचा सल्ला दिला होता.
या सूचनेनुसार यावर्षीच्या महाशिवरात्रीला बेंगळूरू येथील आश्रमात आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी या ज्योतिर्लिंगावर रुद्राभिषेक करून त्याचे भव्य दर्शन भारतभर सुरू केले आहे. या ऐतिहासिक आणि पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन इचलकरंजी येथे उपलब्ध होणार आहे. गुरुवार, ३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नामदेव भवन, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे हे दर्शन सर्व भाविकांसाठी खुले राहणार आहे.
सायंकाळी ६.३० वाजता नामदेव भवन येथे प्रख्यात गायिका सुमेरू संध्या सिंगर यांच्या सोबत भव्य सत्संग आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला श्री श्री श्री रविशंकर यांचे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दर्शक हाथीजी आणि वेद विज्ञान महाविद्यापीठमधील पंडितजी उपस्थित राहणार आहेत. तरी इचलकरंजी व परिसरातील सर्व नागरिकांनी या प्रसंगी सहभागी होण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिविंग चे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे तसेच स्वयंसेवक नमिता हुल्ले, राहुल रायनाडे, नारायण जोशी विजय साळुंखे, गोपाल चांडक, महेश सारडा. सूर्यकांता खंडेलवाल व सर्व प्रशिक्षक व स्वयंसेवक यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800