सन्मती सहकारी बँकेस ३ कोटी २९ लाख ढोबळ नफा-सुनील पाटील
इचलकरंजी
सन्मती सहकारी बैंक लि. इचलकरजी (मल्टीस्टेट बैंक) या बैंकेचा चालू आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय ४७५ कोटी ३२ लाख इतका आहे चालू आर्थिक वर्षात आरबीआय च्या निकषाप्रमाणे व शासकीय लेखापरिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार मर्व तरतुदी पूर्ण केल्या आहेत,बँकेच्या १२ शाखा असून १० शाखा नफ्यात असल्याने ३ कोटी २९, लाखाचा ढोबळ नफा झाला आहे. सन २०२४-२५ मध्ये ५०० कोटी व्यवसाय केला असून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सीआरएआर प्रमाण किमान ९ टक्के असणे चंधनकारक असताना आपल्या बँकेने सीआरएआरचे प्रमाण १५.२८ टक्के इतके ठेवले आहे. यावरून बँकेची स्वनिधीव्दारे आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम व मजबूत आहे असे बँकेचे चेअरमन सुनिल पाटील यांनी सांगीतले
आर्थिक वर्षात भागभांडवल रू.९ कोटी १३ लाख जमा असून बँके कडे २७७ कोटी २० लाख ठेवी जमा झाल्या असून कर्ज १९८ कोटी ०२ लाख इतके कर्ज वाटप केले आहे. बँकेने सरकारी कर्जरोखे व इतर बँकात १०२ कोटी ५३ लाख इतकी गुतवणुक केलेली आहे,राखीव निधी व गंगाजळी ४५ कोटी ८० लाख इतकी रक्कम ठेवलेली आहे बँकेचा सीआरएआर १५.२८ असून एकूण व्यवसाय में ४७५ कोटी ३२ लाख इतका झाला आहे बँकेचे खेळते भाडयल ३५३ कोटी १२ लाख इतके आहे. सन २०२५-२५६ या आर्थिक वर्षात बँकेने ४०० कोटी ठेवीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. अशी माहिती चेअरमन सुनिल पाटील यांनी दिली यावेळी व्हा.चेअरमन महादेव कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते
लवकरच सांगली शाखा सागली शहरातील महावीर नगर बखारभाग जैन बोर्डीग येथे नवीन जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह स्थलांतरीत करत आहोत आमच्या बैंकने शेतकरी, शेतमजूर, छोटे मोटे उदयोजक, नोकरदार यांच्या आर्थिक गरज भागविण्यासाठी जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याचा प्रयल केलेला आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मदत करून त्याच्या जीवनामध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आमच्या बँकेने कर्जावरील व्याजदर माफक ठेवून कर्ज पुरवठा केलेला आहे बँकेचे एकूण १२ शाखे व्दारे महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात आपल्या बँकेचा व्यवसाय चालू आहे. कार्यरत असून ९ ऑनसाईट व १ ऑफसाईट एटीएम आहेत कॅशलेस व्यवहारासाठी क्यु आर कोड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे बँकेच्या खातेदाराना कोड स्कॅनिगचे माध्यमातून खातेदारांना सेवा सुबिधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे बँकेचे व्हा. चेअरमन महादेव कांबळे यांनी सांगीतले.
बँकेने ठेवीवरील व्याजासाठी तीव स्पर्धेला तोंड देत कर्जे, ठेवी, नफा, एनपीए हया गोष्टी अपेक्षीत यश संपादन करून ग्राहकाचे सेवेच्च्या माध्यमातून यशस्वी वाटचाल केलेली आहे सर्व मोठ्या बँकेशी स्पर्धा करावी लागत असलेने व यशस्वीरीत्या सामोरे जाणेसाठी बँकेत आधुनिकता, तंत्रज्ञानयुक्त, आर्थिक शिस्त, व्यवसायिक व्यवस्थापन व उत्तम दर्जचि ग्राहक सेवा यावर आधिकाधिक चांगल्या पध्दतीने भर देण्यात आलेला आहे बँकेस मल्टीस्टेट हा दर्जा मिळाल्याने बँकेस शेडयुल्ड दर्जाच्या बैंकाप्रमाणे आरवीआय तपासणी दर वर्षी होते व केंद्रीय निबंधक सहकारी संस्था यांच्या कडील अनेक नियमांचे पालन करावे लागत असल्याने जुन्या सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना चांगल्या सेवा देताना आरवीआयचे नियम अडचणीचे होत आहेत. तरीही बँकेने आधुनिक नवीन तंत्रज्ञानाव्दारे अधिकाधिक चांगल्या दर्जाची सेवा खातेदारांना दिलेल्या आहे
मागील दोन वर्षात एनपीए नध्ये झालेली वाढ आरबीआय कडून वसुली वावत झालेला निर्देशानुसार बँकेने अनेक चालू आर्थिक वर्षात अनेक मोठमोठ्या कर्जदारांवर बँकेने नाईलाजास्तव कटू भुमिका घेवून वसुली करावी लागली आहे. त्यामुळे बँकेला थकवाकी नियंत्रित ठेवण्यात यश प्राप्त झाले आहे बँकेचे कर्जदार ग्राहकांनी सुध्दा बँकेची भूमिका समजून घेवून थकीत रक्कम वसूल करण्यास सहकार्य केले याचद्दल कर्जदार सभासदांचा अत्यंत ऋणी आहे. कायदेशीर कारवाई करून वसुलीच्या माध्यमातून NPA कमी करण्याचा प्रयत्न केला आह थकीत कर्जाची वसुली करण्याचा प्रयत्न चालू आहे मात्र सभासद ठेवीदार व खातेदार यांनी बकेवरील विश्वास ढळू दिलेला नाही त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.यावेळी संचालक संजय चौगुले,समीर मैदरगी,महेश कुंभार यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800