आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पाच नवीन बसेसचे लोकार्पण
इचलकरंजी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व राज्य शासनाकडे आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात नव्याने पाच अत्याधुनिक सुविधा असलेल्या एस.टी.बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा शनिवारी आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची उपस्थिती होती.
इचलकरंजी हे हातकणंगले तालुका, आसपासचा परिसर आणि नजीकच्या सीमावर्ती भागासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील बसस्थानकाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसुल मिळतो. परंतु याठिकाणी सध्या असलेली दळणवळण यंत्रणा ही अपुरी पडत होती. त्यासाठी इचलकरंजी बसस्थानकात नवीन बसेसची गरज निर्माण झाली होती. या संदर्भात इचलकरंजी आगाराकडून आमदार राहुल आवाडे यांच्याकडे शासन दरबारी पाठपुराव्यासाठी विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून नवीन ५ बसेस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार आहेत. संपूर्ण अत्याधुनिक सुविधा व यंत्रणा असलेल्या या बसेसमुळे इचलकरंजी आगाराच्या वैभवातही भर पडली आहे.
येथील मध्यवर्ती बसस्थानकात आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर आमदार आवाडे यांच्यासह उपस्थिती अधिकारी व मान्यवरांनी या नवीन बसमधून शहरातून फेरफटका मारत या नवीन बसमध्ये असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, वाहतूक अधिक्षक शिल्पा थोरात, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक सुहास चव्हाण, आगार व्यवस्थापक सागर पाटील, आनंदा दोपारे, संघटना प्रतिनिधी जावेद बागवान यांच्यासह प्रकाश दत्तवाडे, पै. अमृत भोसले, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, नरसिंह पारीक, चंद्रकांत इंगवले, प्रशांत कांबळे, श्रीकांत टेके, संजय केंगार, राजू बोंद्रे, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते, शोभा कापसे, राजू पुजारी, सुखदेव माळकरी आदींसह बसस्थानकातील वाहक, चालक व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800