इचलकरंजीत कोयत्याने हल्ला : हद्दपार आरोपीवर गुन्हा
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील म्हसोबा गल्ली चौकात घडलेल्या कोयता हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आला असून, दोन्ही आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले.जामीन मंजूर झाल्यानंतर हद्दपार आरोपीस कर्नाटकात सोडण्यात आले.
फिर्यादी आकाश राजाराम लंगोटे (वय २७, रा. पी. बा. पाटील मळा, टाकवडे वेस, इचलकरंजी) हे त्यांचे मित्रांसोबत कार्यक्रम पाहत असताना आरोपी संदेश कापसे व ओमकार पोवार यांच्यातील वादात मधे पडल्याने, संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. ओमकार पोवार याने त्याच्या ओला गाडीतील कोयता काढून संदेश कापसे याच्या हातात दिला. संदेश कापसे याने तक्रारदाराच्या डोक्यावर जोरदार वार केला. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुख्य आरोपी संदेश कापसे हा पूर्वीपासूनच हद्दपार असूनही इचलकरंजीमध्ये वावरताना आढळला.पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर परत कर्नाटकात सोडण्यात आले.
या प्रकरणाचा तपास साजिद कुरणे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800