भारतीय जनता पार्टी वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी
भारतीय जनता पार्टी इचलकरंजी वतीने आज १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर कार्यालय येथे सकाळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन मा. मंत्री प्रकाश आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले उपस्थित होते. सामूहिकरीत्या बौध्द वंदना करण्यात आली.
यावेळी संबोधित करताना मा.मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले कि, एकसंघ भारताचे श्रेय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय आहे. असे म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधांनामुळे देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहे. हे फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सांगुण उपस्थितांना शुभेच्या दिल्या.
यावेळी अशोक स्वामी, युवा अध्यक्ष जयेश बुगड, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.अश्विनी कुबडगे, दीपक पाटील, संजय गेजगे, प्रशांत कांबळे, अविनाश कांबळे, बंडोपंत लाड, चंद्रकांत इंगवले, अॅड.भरत जोशी, अरुण कुंभार, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, रिषभ जैन, तानाजी पोवार, नागुबाई लोंढे, बालकृष्ण तोतला दिपक राशिनकर, विनोद कांकानी, प्रदीप मळगे, जयवंत पाटील, शंकर झित्रे, नरसिंह पारिक,आशिष खंडेलवाल, संजय केंगार, अमर कांबळे, संजय नागुरे,वसंत पोवार,अभय बाबेल त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800