आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते श्री महावीर जैन भवनमधील केनोपीचे उद्घाटन
इचलकरंजी
श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ इचलकरंजी यांच्या वतीने शहरातील श्री महावीर जैन भवनच्या प्रांगणात नवनिर्मित केनोपीचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम शासनज्योती डॉ. प्रतिभाश्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या साध्वी मल्लीश्रीजी म.सा., साध्वी आस्थाजी म.सा. आदि ६ साध्वीजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाला.
सुरुवातीस मंत्री जयंतीलाल सालेचा यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष रमेश जैन यांनी दानशूर बोरा कुटुंबाच्या कार्याचे कौतुक करत सामाजिक सहभागातील महत्त्व अधोरेखित केले. या केनोपीचे निर्माण कार्य राष्ट्रसंत आचार्य भगवंत गुरूदेव प.पु. आनंदऋषिजी म.सा. यांच्या कृपाआशीर्वादाने स्व. विजयकुमार बाबुलाल बोरा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती लता बोरा यांच्या प्रेरणेने हर्षल व सपना बोरा व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी केले. यामध्ये संजय बोरा, मयुरा-निलेश खिंवसरा, मेघा प्रणेश दुगड, श्वेता राजु बोंद्रे तसेच विजयकुमार बाबुलाल बोरा प्रतिष्ठान’ व ‘वीहा क्रिएशन’ यांचा मोलाचा सहभाग राहिला. याप्रसंगी संघाचे निवर्तमान अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया, उपाध्यक्ष राहुल बोरा, कोषाध्यक्ष गौतम मुथा, सहसचिव घिसुलाल पारख, ट्रस्टी संजय गुगळे, राजेश भंडारी, भरत बोहरा, दीपक बेदमुथा, अभिजित पटवा यांच्यासह माजी नगरसेवक राजु बोंद्रे, महावीर जैन, दिलीप मुथा, सतीश मुळीक, नितेश पोवार आदी आणि धर्मप्रेमी समाजबांधव उपस्थित होते.
आ.राहुल आवाडे यांचे स्वागत करण्यात आले.
केनोपीचे उद्घाटन करताना आ.राहुल आवाडे,रमेश जैन,श्रीकांत चंगेडिया,राहुल बोरा,हर्षल बोरा,राजु बोंद्रे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








