ICHMH51NEWS.IN
9921600800

शौचालय वादातून झटापट – विनयभंगाचा गुन्हा दाखल; इचलकरंजी पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शौचालय वादातून झटापट – विनयभंगाचा गुन्हा दाखल; इचलकरंजी पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

इचलकरंजी  –
शौचालयाच्या वादातून सुरू झालेल्या भांडणात प्रतिकार करताना झालेल्या झटापटीचे रूपांतर थेट विनयभंगाच्या गुन्ह्यात झाले असून, यामध्ये इचलकरंजी पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सदर प्रकरणात तक्रारदारास मारहाण झाली असून पोलिसांच्या बंदोबस्तात घराबाहेर पडताना पुन्हा एकदा दबा धरून बसलेल्या महिलांनी शिवीगाळ करत पोलिसांच्या समोरच मारहाण करण्यात आली. या मारहाणीतूनच नंतर संबंधित व्यक्तीविरुद्धच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या साऱ्या घटनेनंतर आरोपी दीपक जाधव यांना पोलिसांनी दिवसभर ताटकळत ठेवले.अन्नपाणी नसल्याने तब्येत बिघडल्यामुळे सायंकाळी चक्कर येऊन ते खाली कोसळले आणि त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. दीपक जाधव यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पंचनामा करताना पोलिसांसमोरच एका आरोपी व्यक्तीने “घराकडे आलास तर जीवे मारू” अशी धमकी दिली. तरीही पोलिसांनी त्यास हटकण्यापलीकडे काही केले नसल्याने उलट दबावाखाली विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे ज्या इस्पितळात दीपक जाधव यांना दाखल करण्यात आले, तेथे प्रथम तापसी पोलिसांनी वारंवार संपर्क करत सहकार्याची भूमिका घेतली.डॉक्टरांनी दिवसभर पोटात काही नसल्याने जेवण करण्याचा सल्ला दिला त्यानंतर रिपोर्ट चांगले आल्यावर पोलीसाने पुन्हा पलटी मारल्याचा आरोप करत, इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या डबलगेमवर संशय व्यक्त केला जात आहे.
एकंदरीत किरकोळ वादातून विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी एखाद्याचे आयुष्य उद्धवस्त करण्याची सुपारी घेतली का अशीही चर्चा होत आहे
या संपूर्ण घटनेमुळे पोलिसांची विश्वासार्हता आणि निष्पक्षता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शौचालय वादातून उगम पावलेल्या या प्रकरणात पोलीस राजकीय किंवा स्थानिक दबावात काम करत आहेत का? दिवसभर तक्रार दारास ताटकळत ठेवण्याचे प्रयोजन काय याची सखोल चौकशी व्हावी, व दोषी पोलिसांवर व नागरिकांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
दीपक जाधव यांच्या भावास जमावाने केलेली मारहाण
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा