गणेश भांबे यांना मातृशोक,सुरेखा भांबे यांचे निधन
इचलकरंजी – येथील ज्येष्ठ राजकीय, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुरेखा जयराम भांबे यांचे रविवारी निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या.
व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुरेखा भांबे
यांनी पुजारी मळा परिसरात श्री शक्ती महिला विकास मंडळाच्या माध्यमातून आरोग्य, उद्योग शिबिर घेऊन महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम सातत्याने राबवले.
जयराम भांबे हे संघ स्वयंसेवक तर सुरेखा भांबे या राष्ट्र सेविका समितीचे काम करत होत्या. भाजपच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष असलेल्या भांबे यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. पुढे त्यांनी शिवसेना महिला आघाडीचे उपशहर प्रमुख म्हणून काम केले.
त्यांच्या मागे मुलगा शिव उद्योग संघटनेचे समन्वयक, उत्कर्ष उद्योजक संस्थेचे संस्थापक गणेश भांबे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. आज पंचगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फोटो – सुरेखा भांबे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







