ICHMH51NEWS.IN
9921600800

मतदारसंघातील माता-भगिनींच्या सन्मानासाठी कटिबद्ध-आ.राहुल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मतदारसंघातील माता-भगिनींच्या सन्मानासाठी कटिबद्ध-आ.राहुल आवाडे

इचलकरंजी:
मतदारसंघातील माता-भगिनींना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेले इचलकरंजी मतदारसंघात जितका पुरुष काम करतो तितकीच मेहनत येथील माता-भगिनीही करतात. काळानुरूप यंत्रमाग व्यवसायाबरोबर गारमेंट व्यवसाय देखील प्रगतीपथावर असून इचलकरंजी हे गारमेंट सिटी म्हणून ओळखले जात आहे. म्हणून महिलांनीही पुढाकार घेऊन स्वावलंबी बनावे. त्यासाठी सर्वतोपारी सहकार्य करू अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय येथे रविवारी भाऊ-बहिणींचे नाते जपणारा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील जवळपास ५०० पेक्षाअधिक लाडक्या बहिणींनी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांना राखी बांधली. महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी मी सदैव तुमचा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाहीही आमदार आवाडे यांनी दिली.
यावेळी प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, भाजपा शहर पुर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, नरसिंह पारीक, राजु भाकरे, अश्विनी कुबडगे, रमा फाटक, पुनम जाधव, नजमा शेख, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते, जयश्री शेलार, मंगल सुर्वे, सुवर्णा लाड, नागुबाई लोंढे यांच्यासह महिला तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा