ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी सेंट्रल एक्झिक्यूटिव्ह प्रोबस क्लब आयोजित, नीलम माणगावे यांचे छोट्या लोकांच्या मोठ्या गोष्टी या विषयावरील व्याख्यान संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी सेंट्रल एक्झिक्यूटिव्ह प्रोबस क्लब आयोजित, नीलम माणगावे यांचे छोट्या लोकांच्या मोठ्या गोष्टी या विषयावरील व्याख्यान संपन्न.

इचलकरंजी
समाजातील विविधांगी अनुभव आणि लोकमानसांचे भाव-दर्शन यातुनच कविता-कथा जन्माला येतात– कवियत्री नीलम माणगावे यांच प्रतिपादन.
    रोटरी सेंन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजी च्या वतीने जेष्ठ कवियत्री-लेखिका मा. नीलमताई माणगावे यांच्या ” छोट्या माणसांच्या मोठ्या गोष्टी ” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले, अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते हे होते स्वागत आणि व्याख्यात्यांची  ओळख सेक्रेटरी श्री किरण कटके यानी केले, व्याख्या त्यांचा सत्कार जयश्री चौगुले यांनी केला, प्रास्ताविक अध्यक्ष श्री सुनिल कोष्टी यानी केले,
    आपल्या व्याख्यानातुन कविता आणि लेखन यांच्या निर्मितीच्या अनेक अनुभव प्रसंग सांगितले, ग्रामीण भागातील शिक्षणाने अशिक्षित असलेल्या मनुष्य स्वभवांचे अनैक पैलु त्यानी सांगितले, निरीक्षणातुन, प्रवासात भेटलेल्या विविध प्रसंगातून भाव-भावनांचे जे प्रसंग निर्माण होतात त्यातुनच  कविता आणि कथा-कादंबरीचा जन्म होतो असे त्यानी सांगितले,
    यावेळी आपटे वाचन मंदिराच्या उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या श्री काशिनाथ जगदाळे, दक्षिण भारत जैन सभेच्या बोर्डींग सदस्यपदी श्री प्रकाश आकीवाटे यांचा तर प्रमोदिनी देशमाने यांना गौरव पुरस्कार मिळाले बद्दल मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला,
 अध्यक्षयी भाषणात संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यानी रोटरी परीवार आणि रोटरी प्रोबसच्या कामकाज व उपक्रम याची माहिती दिली.
 यावेळी नवीन सदस्य व वाढदिवस असणार्‍यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांचे  हस्ते करण्यात आला.
 आभार श्री हेमंत कवठे यानी मानले.
यावेळी सदाशिव काजवे, बाबासाहेब पाटील, शिव बसू खोत, शिवसवदीमठ, अँड. विश्वासराव चुडमुंगे, प्राजक्ता होगाडे, जयप्रकाश शाळगावकर, मल्लीकार्जुन तेग्गी, वैभव डोंगरे, के. एम. मगदूम, नीता दोड्डनावर, गजानन शिरगुरे, प्रमोद लाटणे, सदाशिव मेटे, अनिल ज्वारे, आनंद मेटे, अविनाश खोत, दिलीपराव भंडारे, सुर्यकांत बिडकर, डॉ.कुबेर मगदूम,ज्ञानदेव मेटे, सौ. एम व्ही ठोंबरे, शालिनी जगदाळे, मंगल डोंगरे, कविता कटके, आनंदी हजारें, गीता लाटणे, शारदा कवठे, जगन्नाथ पोटे, माधवी कुलकर्णी, विना श्रेष्ठी, दिपाली कोळी, उज्वला होगाडे, विजय सोनी, जोतीराम वरुटे, विश्वनाथ एकार, शबनम नाईकवाडे, शैलजा सवदीमठ, इत्यादी सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
निलम माणगावे यांचे स्वागत करताना पदाधिकरी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा