डी.के.ए.एस.सी. कॉलेजमध्ये ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी : दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये एस.आर. रंगनाथन जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांमधील ‘बेस्ट रीडर’ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. अनिल पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे होते. ‘बेस्ट रीडर’ पुरस्कार विजेत्यांमध्ये कु. सानिका भामणे (विद्यार्थी), प्रा. डी. जे. मुंगारे (प्राध्यापक) आणि श्री. जयकुमार करके (शिक्षकेतर कर्मचारी) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे डॉ. पाटील यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “वाचनाने माणूस समृद्ध होतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयच्या युगात आळशीपणा वाढू शकतो, त्यामुळे पुस्तकांशी नाते जोडणे गरजेचे आहे.” अध्यक्षीय भाषणात डॉ. खाडे म्हणाले की, “अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन करून सर्वांगीण विकास साधावा. वाचन हाच विकासाचा राजमार्ग आहे.”
कार्यक्रमात प्रा. डी. ए. यादव आणि प्रा. व्ही. पी. पाटील यांचीही उपस्थिती होती. स्वागत ग्रंथपाल सौ. स्वाती देसाई यांनी केले, प्रास्ताविक प्रा. रोहित शिंगे यांनी तर आभार कु. संजीवनी कदम हिने मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथपाल दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य अनिल पाटील.शेजारी प्राचार्य डॉ.एस.के.खाडे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








