ICHMH51NEWS.IN
9921600800

४ ऑक्टोंबर पासून संपूर्ण भारतामध्ये दोन टप्यांमध्ये समाशोधन (क्लिअरींग) ज्या-त्या दिवशी जमा होणार – दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या प्रयत्नांना यश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

४ ऑक्टोंबर पासून संपूर्ण भारतामध्ये दोन टप्यांमध्ये समाशोधन (क्लिअरींग) ज्या-त्या दिवशी जमा होणार – दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या प्रयत्नांना यश

इचलकरंजी
दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने सातत्याने केलेल्या समाशोधन (क्लिअरींग) रोजच्या रोज जमा करणेच्या मागणीस रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या बोर्डाने मान्य करून दोन टप्यांमध्ये संपूर्ण भारतात सुरू होणार आहे. पहिला टप्पा येत्या ४ ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे तर दुसरा टप्पा २ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पत्र दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला प्राप्त झाले आहे.
दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रमुखांकडे ज्या-त्या दिवशी समाशोधन (क्लिअरींग) जमा मिळावे यासाठी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती. यातील तांत्रिक अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली होती. गेल्या दोन ते तीन वर्षातील सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कांही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समाशोधन (क्लिअरींग) रोजच्या रोज जमा देणेविषयी बँकिंग क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय घेतला व १ जानेवारी २०२५ पासून रोजच्या रोज समाशोधन (क्लिअरींग) सुरू करणेचे नोटीफिकेशन काढले होते. परंतू कर्नाटक येथील लहान बँकांकडे सॉफटवेअरची सुविधा नसलेने सेम डे क्लिअरिंग सुरू होऊ शकले नव्हते. परंतू दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन सातत्याने रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे पाठपुरावा सुरू ठवला होता. दि. २१ जुलै २०२५ रोजी मा.गव्हर्नर यांचेकडे मागणी केली होती. त्यास अनुसरून दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी रिझर्व्ह बँकेने नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे सेम डे क्लिअरिंग जमा मिळणेचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदलामुळे फक्त इचलकरंजीमधील उद्योजक व व्यापारी यांना ६५ ते ७५ कोटी रूपये अतिरिक्त रोज उपलब्ध होणार आहेत.
पहिला टप्पा ४ ऑक्टोंबर २०२५ पासुन सुरू होत आहे. तर दुसरा टप्पा २ जानेवारी २०२६ पासुन सुरू होईल. यात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत चेक स्विकारले जातील. बँकांना मिळालेले चेक लगेच स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसला पाठवावे लागतील. आणि दुसऱ्या बँकेने ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चेक मंजूर किंवा नामंजूर असलेचे कळवावे लागेल. जर बँकेने वेळेत उत्तर दिले नाही तर चेक आपोआप मंजूर मानला जाईल. बँकांना चेक मिळाल्यानंतर जास्तीत जास्त तीन तासांच्या आत मंजूरी द्यावी लागणार आहे. वेळेत मंजूरी न दिल्यास चेक सेटलमेंट झाल्यावर बँकेने ग्राहकाला पैसे लगेच पण किमान १ तासात द्यावे लागतील. दुसऱ्या टप्पात २ जानेवारी २०२६ पासून सकाळी ११ पासून दर तासाला क्लिअरिंग सुरू होऊन सायंकाळी ७ पर्यंत दर तासाला सेटलमेंट केले जाणार आहे.
यापूर्वीही इचलकरंजीतून अनेक ऐतिहासिक निर्णयाची नांदी झालेली आहे. बँकिय क्षेत्रातील रोजच्या रोज समाशोधन (क्लिअरींग) मिळणे हा एक ऐतिहासिक निर्णय इचलकरंजीकरांच्या प्रयत्नामुळे संपूर्ण भारताला मिळतो आहे. या निर्णयामुळे भांडवलाची अतिरिक्त उपलब्धता झालेने उद्योग व व्यापार करणे सोईस्कर होणार आहे. त्याचबरोबर कर्जावरील व्याजाची बचत होणार आहे. यापूर्वी समाशोधन (क्लिअरींग) साठी चेक बँकेत जमा केलेनंतर संबंधीत रक्कम तीसऱ्या दिवशी आणि जर बँकेस सुट्टी असेल तर ती चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पैसे वापरात येत होते. परंतू या निर्णयामुळे आता तीन तासाच्या सायकलमध्ये ज्या-त्या दिवशी पैसे खात्यावर जमा होणार आहेत व ते पुढील व्यवहारासाठी वापरता येणार आहेत. या निर्णयाबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी यांचे दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा