भाजपच्या वतीने ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी:
भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे फोटोचे पूजन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. तसेच भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक मराठा बटालियनचे फौजदार श्री.अमर अंतु राऊत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून पुसपहार अर्पण करून ध्वज पूजन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.राहुल आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अशोक स्वामी उपस्थित होते.
यावेळी, भाजपा जेष्ठ नेते पांडुरंग म्हातुगडे, श्री.श्रीरंग खवरे अध्यक्ष पूर्व मंडल, श्री.बाळासाहेब माने अध्यक्ष इचलकरंजी ग्रामीण मंडल, शहाजी भोसले, सौ.नीता भोसले, सौ.अमिता बिरंजे, सौ.माधवी मुंडे, सौ. सीमा कमते, सौ. सपना भिसे, नजमा शेख, मंगल सुर्वे, सुवर्णा लाड, सौ. रंजना डावरे, सतिश पंडित, उमाकांत दाभळे, महेश पाटील, मारुती पाथरवट, राजेश रजपुते, प्रकाश दत्तवाडे, राजू बचाटे, बाळासाहेब कलागते, शेखर शहा,अरुण कुंभार, ऋषभ जैन, किसन शिंदे,अमर कांबळे,राजू बोंद्रे, अमित जावळे,प्रसाद खोबरे,प्रमोद बाचाटे, बाळकृष्ण तोतला, जयदिप पाटील, सतीश मुळीक, इमरान बागवान, सतीश खंडेलवाल, संजय गेजगे, राजेंद्र पाटील, सागर कचरे, सलीम शिकलगार, हेमंत वरुटे, रहीम सोलापूरे, गणेश पिसके, श्रीकांत टेके, चंद्रकांत सुतार,नागेश पाटील, ईश्वर कांबळे, सलीम शिकलगार, भगवान बरगाले, अविनाश कांबळे, अहमद मुजावर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







