इचलकरंजीचे ट्रॅफिक हवालदार राजु पट्टणकुडे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती
इचलकरंजी :
इचलकरंजी शहर पोलीस ठाण्यात ट्रॅफिक विभागात कार्यरत असलेले हवालदार श्री. राजु रामचंद्र पट्टणकुडे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पदावर पदोन्नती झाली आहे.
अलीकडेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना महासंचालक पदक, पोलिस पदक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले होते. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक तसेच गोविंदराव हायस्कूल (दहावी बॅच १९९२) तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
राजु पट्टणकुडे हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे, माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून इचलकरंजीत परिचित आहेत. त्यांच्या पदोन्नतीमुळे मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







