ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवसेनेची ०२ लाख २२ हजार २२२ रुपयांची निष्ठाहंडी शिरोळच्या गोडी विहीर गोविंदा पथकाने फोडली.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेनेची ०२ लाख २२ हजार २२२ रुपयांची निष्ठाहंडी शिरोळच्या गोडी विहीर गोविंदा पथकाने फोडली.

हुपरी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा आणि हुपरी शहर शिवसेना यांच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या *”निष्ठावंतांची दहीहंडी २०२५” ही शिरोळच्या गोडी विहीर गोविंदा पथकाने फोडून ०२ लाख २२ हजार २२२ रुपयांच्या बक्षिसाची* रक्कम आणि सन्मानचिन्ह पटकावले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि हंडीचे पूजन शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या शुभहस्ते तसेच सह संपर्कप्रमुख विजय देवणे, हाजी असलम सय्यद, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, मा. जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, पंचायत समिती सदस्य अरुण माळी, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदूम, शिवाजी पाटील, हुपरी शिवसेना शहरप्रमुख विनायक विभुते, महिला आघाडी तालुकाप्रमुख उषाताई चौगुले, महिला आघाडी शहर प्रमुख मीनाताई जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले.
या दहीहंडी सोहळ्यामध्ये तीन पथकांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये आमरेश्वर गोविंदा पथक औरवाड, गोडी विहीर गोविंदा पथक, शिरोळ आणि जय महाराष्ट्र गोविंद पथक, शिरोळ या गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदवला.


पहिल्यांदा सलामी नंतर ३५ फुटावर बांधलेल्या या हंडीपर्यंत पोहोचण्याचा तिन्ही मंडळांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यामध्ये तिन्ही मंडळांना अपयश आल्यानंतर हंडीची उंची ३० फुटावर आणण्यात आली. यानंतर जय महाराष्ट्र गोविंद पथकाला चिठ्ठी मधून प्रथम संधी मिळाली. यामध्ये त्यांनी हंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये अपयश आले. त्यानंतर चिट्टी मध्ये अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर *गोडी विहीर या गोविंदा पथकाला संधी देण्यात आली त्यांनी सहा थर लावत ही शिवसेनेची निष्ठावंतांची दहीहंडी फोडली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले व प्रति बाळासाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या विवेक देवरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी गोविंदा पथकाला ०२ लाख २२ हजार २२२ रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिवसभर पावसाची रिपरीप सुरूच होती. संध्याकाळी देखील पावसाचा हा लपंडाव सुरूच राहिला, परंतु दहीहंडी सोहळ्याच्या उत्कृष्ट आयोजनामुळे दहीहंडी शौकिनांची तुडुंब गर्दी मैदानावर झाली होती, शिवाय वरून पडणाऱ्या पावसामध्ये देखील एकही दहीहंडी शौकीन जागा सोडून न हलता, आहे त्या ठिकाणी उभा राहून या दहीहंडी सोहळ्याच्या आनंद लुटत होता.
या दहीहंडी सोहळ्यास शिरोळ तालुकाप्रमुख संजय अनुसे, उपतालुकाप्रमुख योगेश कुलकर्णी, ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख देवाशिष भोजे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे, अमोल देशपांडे, संजय लोहार, इचलकरंजी शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, धनाजी मोरे, आरोग्यसेना जिल्हासमन्वयक विकी मोहिते, कोल्हापूर कट्टर शिवसैनिक ग्रुपचे गोविंद वाघमारे, दिनेश साळोखे, इचलकरंजी मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत, शुभम चौगुले, इंगळी शहरप्रमुख केशव पाटील, यळगुळ शहरप्रमुख अनिल रोटे, रेंदाळ शहरप्रमुख माहिपती पाटील, सुहास सपाटे, राजू मोकाशी, विनोद पाटील, उमेश पाटील, व इतर शिवसैनिक आणि हुपरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा