ICHMH51NEWS.IN
9921600800

जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडून इचलकरंजी येथील पुर परिस्थितीची पाहणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडून इचलकरंजी येथील पुर परिस्थितीची पाहणी

इचलकरंजी
 गेले काही दिवस इचलकरंजीसह
सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात महापूराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. महापुर  परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दि.२१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी शहरास भेट देऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या समवेत शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करून संभाव्य महापुराच्या  परिस्थितीचा आढावा घेतला.
     इचलकरंजी शहरातील मागील काही वर्षांची पूर परिस्थिती विचारात घेऊन निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीमध्ये यंत्रणा कार्यान्वित करुन  महानगरपालिका प्रशासनाला सतर्क रहाणेच्या सुचना दिल्या.
 यावेळी  आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी शहरात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीची तसेच संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेकडून करणेत येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना देऊन  महानगर पालिकेची यंत्रणा संभाव्य पुर परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज असलेची माहिती दिली,
यावेळी जिल्हाधिकारी यांनी शहरातील पुरक्षेत्रातील  नागरिकांनी सतर्क राहावे आणि वेळीच स्थलांतरित होणेचे आवाहन केले.
          यावेळी उप विभागीय अधिकारी दिपक शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे, आरोग्य अधिकारी दुरूगकर, सचिन भुते यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभाग यांत्रीक बोटीवरील जवान व अग्निशमन दलातील फायर- फायटर्स जवान तुषार हेगडे, तसेच पोलिस बाॅईज असोसिएशन ची टीम यांचेसह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पूरपरिस्थिती पाहणी करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे,आयुक्त पल्लवी पाटील व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा