गंगामाई शाळेतील विद्यार्थिनींकडून पत्रातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
इचलकरंजी, दि. 21 ऑगस्ट –
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये इ. 6 वी व 7 वीच्या विद्यार्थिनींसाठी पत्रलेखन कार्यशाळा उत्साहात पार पडली. मोबाईल, आंतरजाल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात हरवणारी पत्रलेखन कला विद्यार्थिनींना शिकवून देण्याचा या उपक्रमाचा हेतू होता.
“माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पर्यावरण सेवा योजना (ESS) राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना उद्देशून पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी पत्र लिहिले. छोट्या लेखनातून मोठा संदेश देण्याचा आनंद मुलींनी घेतला.
कार्यशाळेचे मार्गदर्शन इको क्लबच्या योजना प्रमुख शिक्षिका आर. एस. रॉड्रीग्युस यांनी केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी यांनी पत्रलेखनाचे महत्व सांगून पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे आवाहन केले. निसर्ग प्रदूषण व आरोग्य यांचा सहसंबंध स्पष्ट करून विद्यार्थिनींना पालकांपर्यंत संदेश पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
पर्यवेक्षक एस. एस. कोळी यांनी पत्रव्यवहाराची रचना कशी करावी याचे मार्गदर्शन केले. एस. एच. मुजावर व जे. जी. देशपांडे यांनी विद्यार्थिनींकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची प्रतिज्ञा म्हणून घेतली.
कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक व्ही. व्ही. इंगवले यांच्या माध्यमातून कार्यशाळेत सहभागी झालेल्या 100 विद्यार्थिनींची पत्रे थेट पोस्ट कार्यालयातून पाठविण्यात आली
‘ इको क्लब ‘ अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पत्रलेखन कार्यशाळेत सहभागी विद्यार्थीनी,मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







