ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत पोलीस कर्मचारी व वकिलाकडून लाच मागणी; लाचलुचपतची कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत पोलीस कर्मचारी व वकिलाकडून लाच मागणी; लाचलुचपत ची कारवाई

इचलकरंजी दि.२१ :
इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ हारून सय्यद व खाजगी वकील पवनकुमार अशोक उपाध्ये या दोघांनी तक्रारदाराकडून चेक परत मिळवून देण्यासाठी लाच मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या अर्जाची चौकशी पोलीस सय्यद करत असताना त्यांनी मध्यस्थी करून वकिलाच्या माध्यमातून पैशांची मागणी केली. सुरुवातीला तक्रारदारास ४०,००० रुपये वकील उपाध्ये यांच्या खात्यावर पाठविण्यास भाग पाडण्यात आले.ही रक्कम उपाध्ये यांनी सय्यद यांच्याकडे दिली.तरीदेखील चेक परत न मिळवून देता, पुढील व्यवहारासाठी तक्रारदाराकडे ३ लाख लाचेची मागणी करण्यात आली.

तक्रारदाराने ही बाब अँटी करप्शन ब्युरो (ACB) कोल्हापूर येथे लेखी तक्रारीद्वारे मांडली. प्राथमिक पडताळणीत दोन्ही आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो पुणे व श्री. अर्जुन भोसले, अपर पोलीस अधीक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस उपअधीक्षक, ACB कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये प्रकाश भंडारे, विकास माने, संदिप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील व प्रशांत दावणे या पथकातील अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा