भिंत कोसळून सहा जण जखमी; ५० हजारांचे नुकसान
इचलकरंजी –
शहापूर तोरणानगर सहारा निवारा कॉलनी येथे शनिवारी पहाटे ५ वाजता भिंत कोसळून सहा जण जखमी झाले. शेजारील सुरू असलेल्या आर.सी.सी. बांधकामामुळे ही दुर्घटना घडली.
जमीर शाहबुद्दीन गोलंदाज (४४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कुटुंबासह झोपेत असताना त्यांच्या घराची पश्चिमेकडील भिंत कोसळली. यामध्ये फिर्यादी, पत्नी जबिन, मुले अमन, आलिया, आलिशा व वडील शाहबुद्दीन हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आय.जी.एम. हॉस्पिटल, इचलकरंजी येथे दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत घरातील फ्रिज, टी.व्ही., लोखंडी कपाट आदी प्रापंचिक साहित्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. शेजारील बांधकामधारक नानासो शिवाजी वायंदडे (५९, रा. लालनगर, इचलकरंजी) यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पो.हे.कॉ. बांगर करीत आहेत
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







