ICHMH51NEWS.IN
9921600800

लायन्स इंटरनॅशनल फर्स्ट झोन एडवायजरी मीटिंग उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लायन्स इंटरनॅशनल फर्स्ट झोन एडवायजरी मीटिंग उत्साहात संपन्न

इचलकरंजी
लायन्स क्लब इंटरनॅशनल रिजन 4 मधील झोन 1, झोन 2 व झोन 3 ची पहिली झोन एडवायजरी मीटिंग लायन्स क्लब इचलकरंजीच्या ब्लड बँक हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात झोन चेअरमन ला. रामेशजी पोतदार यांनी ध्वजवंदन करून केली. स्वागत व प्रस्ताविक झोन चेअरमन ला. महेंद्रजी बालर यांनी केले. यावेळी डीसी सर्व्हिस ला. गौरी चव्हाण यांनी सर्व्हिस या विषयावर मार्गदर्शन करून विविध क्लबना करण्याजोग्या उपक्रमांच्या संकल्पना मांडल्या.

मीटिंगमध्ये विविध विषयांवर ओपन चर्चासत्र घेण्यात आले. रिजन 4 चे गायडिंग पीडिजी ला. विजयजी राठी व ला. सुनीलजी सुतार यांनीही आपले मार्गदर्शन दिले.

आभार प्रदर्शन झोन चेअरमन ला. सौ. धनश्री गायकवाड यांनी मानले.

या वेळी रिजन चेअरमन ला. सुनीलजी चव्हाण, DC GLT ला. मंगेशी दोषी, DC Disaster ला. विजयजी जमदग्नी, DC Hunger Relief ला. लिंगराजजी कित्तुरे, DC Image Building ला. अरविंदजी पवार तसेच रिजन 4 मधील लायन्स क्लब इचलकरंजी, कुरुंदवाड, कोल्हापूर, हुपरी, जयसिंगपूर व कोडोली येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लायन्स इंटरनॅशनल फर्स्ट झोन मिटिंग मध्ये पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा