ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लब व इचलकरंजी पोलीस दलातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लब व इचलकरंजी पोलीस दलातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा

इचलकरंजी :
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व इचलकरंजी पोलीस दल यांच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी खुल्या असतील तसेच घरगुती गणेश भक्तांसाठी व रोटरी परिवारासाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

घरगुती गणेश भक्तांनी पारंपारिक वेशभूषेत आरती करताना बाप्पांचे व डेकोरेशनचे फोटो काढून व्हॉट्सअॅप क्रमांक 7776826500 वर पाठवावेत. फोटो पाठविण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2025 अशी आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्याचे परीक्षण रोटरी व पोलीस दलाच्या समितीकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्यात येईल.

स्पर्धेत उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट कलात्मक देखावा, पौराणिक देखावा, ऐतिहासिक देखावा व समाजप्रबोधनात्मक देखावा या विभागात पारितोषिके दिली जाणार आहेत. आरास व डेकोरेशनसाठी केवळ पर्यावरणपूरक साहित्याचाच वापर करावा, थर्माकोल किंवा इतर हानिकारक साहित्य वापरू नये असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली नावे त्वरित रोटरी सेवा केंद्र, दाते मळा, महेश सेवा समिती जवळ, इचलकरंजी येथे नोंदवावीत. तसेच मिरवणुकीमध्ये डॉल्बी व लेसर लाईटचा वापर करणाऱ्या मंडळांचा विचार स्पर्धेत केला जाणार नाही.

विजेत्या घरगुती गणेश भक्त व सार्वजनिक गणेश मंडळांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असल्याचे प्रकल्प अध्यक्ष प्रकाश रावळ, रोटरी क्लब अध्यक्ष रो. संजय घायतिडक व सचिव राजू पाटील यांनी सांगितले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा