ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहरात वाहतुकीचा बोजवारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरात वाहतुकीचा बोजवारा

इचलकरंजी :

शहरात गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस प्रमुखांनी गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन शिस्तबद्ध नियोजनाचे आदेश दिले होते. तसेच महानगरपालिकेनेही सार्वजनिक प्राधिकरणांच्या बैठकीत सूचना केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात नियोजनाचा अभाव ठळकपणे जाणवत आहे.

गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा अभाव असून, काही ठिकाणी ते फक्त दबा धरून बसल्याचे नागरिकांच्या लक्षात येत आहे. यामुळे वाहतूक सुरळीत करण्याऐवजी गोंधळ अधिक वाढला आहे. अवजड वाहनांच्या हालचालींवर कुठलेही नियंत्रण नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे.

वाहतूक बंदी वेळेच्या कालावधीतसुद्धा शहराच्या मुख्य रस्त्यांवरून ट्रॅव्हल गाड्या फिरताना दिसत असून यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा