ICHMH51NEWS.IN
9921600800

गणेशोत्सावमध्ये गावभाग येथील राहूल जगताप यांनी माधुरी हत्तीणचा हालता देखावा सादर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणेशोत्सावमध्ये गावभाग येथील राहूल जगताप यांनी माधुरी हत्तीणचा हालता देखावा सादर

इचलकरंजी ता. ०५ सप्टेंबरः  इचलकरंजीमधील गावभाग येथील वास्वव्यास असलेले राहूल जगताप व कुटुंबीयांनी यावेळी गणेशोत्सावामध्ये आपल्या सर्वांची लाडकी माधुरी हत्तीण यावर सामाजिक संदेश देणारा हालता देखावा सादर केला आहे. या देखाव्यामधून त्यांनी माधुरी हत्तीणचा नांदणी मठ ते वनतारा याचा प्रवास दाखविला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी सामन्य लोकांची माधुरी हत्तीण बददल असलेली भावना व्यक्त केलेली आहे.
गणेशोत्सव काळामध्ये ठिकठिकाणी अभिनव उपक्रम चालू आहेत याची दखल घेत जगताप कुटुंबीयांनी यावेळेचा गणेशोत्सव सामाजिक बांधीलकी जपत करण्याचा मानस केला व सगळयांच्या जिव्हाळयाचा विषयास त्यांनी यावेळी देखाव्याच्या रुपाने मांडणी केली. या देखाव्यात त्यांनी नांदणी मठाचे द्वार दाखवले असून त्या द्वारातून माधुरी हत्तीण बाहेर पडते त्यासोबत नांदणीचे भटटारक महराज यांची प्रतिकृती दाखविली आहे तर नांदणी गावातील ग्रामस्थांनी हार घातलेले दृश्य दाखविली आहेत तर सामन्य नागरिक यांनी हातामध्ये बोर्ड धरुन आपल्या लाडक्या माधुरीबददल आपले भाव त्या बोर्डांच्या माध्यामातून समाजासमोर मांडले आहेत तर दुस-या बाजुला वनताराचे जंगल दाखवले असून तेथे इतर प्राणी दाखवले आहेत. अशे सर्वसामन्य नागरिकांचे भाव लाडक्या माधुरी हत्तीणीबददल जगताप कुटुंबीयांनी समाजासमोर मांडले आहेत.
एखादया प्राण्यांबददल एक चांगला संदेश दयायच्या हेतून हा देखावा सादर केला आहे जेणेकरुन हा भाव न्यायदेवतेला मान्य होईल व आपली माधुरी हत्तीण नांदणीमध्ये लवकर वास्तव्यास येईल या हेतुने या देखाव्याचे सादरीकरण केले आहे. सदर देखाव्यास नागरिकांतून चांगला प्रतिसाद देखील येत आहे. हा देखावा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रितम पाटील, किरण लंगोटे, संजय जगताप, अविनाश दत्तवाडे, सार्थक जगताप, हर्षवर्धन जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फोटो – इचलकरंजी येथील जगताप कुटुंबीयांनी साकारलेला माधुरी हत्तीणवरील यावरील हालता देखावा.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा