ICHMH51NEWS.IN
9921600800

इनामतर्फे विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लेसर विरोधी जनजागरण,पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इनामतर्फे विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लेसर विरोधी जनजागरण,पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी.

इचलकरंजी:
इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत इचलकरंजी नागरिक मंच तर्फे डॉल्बी व लेसर विरोधात जनजागृती करत सुळकुड योजना राबवून पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी करण्यात आली.
इचलकरंजी शहरात अनंत चतुर्दशीची मिरवणुक मोठ्या उत्साहात पार पडली व लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.दरवर्षी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने गणेशोत्सव मंडळांचा सन्मान करून प्रोत्साहन देत असल्याबाबत स्वागत कक्षांचा सन्मान करण्यात येतो.
सद्यस्थितीत इचलकरंजी शहरात डॉल्बीचे प्रमाण वाढत असल्याने त्याचे दुष्परिणामही दिसुन येत आहेत,अबाल वृद्धांना मिरवणुकीचा मनसोक्त आनंद घेता येत नाही,याबाबत इनामच्या वतीने लक्षवेधी फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली.
” तरुणाईने धरला डॉल्बीचा ठेका..चुकतोय आमच्या काळजाचा ठोका..वाढतोय आबालवृद्धांच्या हृदयाचा धोका..
बाप्पा,विसरलो आम्ही पारंपारिक वाद्ये, ताश, लेझिम, ढोल..कधी कळणार आम्हाला आमच्या कांनांचे मोल?..
गणेशोत्सवाची नव्याने आखणी करु..महाराष्ट्रीयन परंपरेची खरी उजळणी करुन
चला… पारंपारिक वाद्यांचा वापर करु..आरोग्यासाठी डॉल्बी आणि डीजे., लेसरला हद्दपार करू…
असे फलक घेऊन इनाम सदस्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
तसेच इचलकरंजी शहरास भेडसवणाऱ्या पाणीप्रश्नी
इचलकरंजीकरांणा शुद्ध व मुबलक पाणी मिळालेच पाहिजे..सुळकुड योजना झालीच पाहिजे..
माता भगिणींची पाण्यासाठी वणवण थांबणार कधी?
नियमित पाणीपुरवठा होणार कधी?
असेही फलक शहरवासियांचे लक्ष वेधत होते.
या फलकासह सर्व स्वागत स्टेजवर  जाऊन विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना फलक हातात देऊन प्रबोधन करण्यात आले.
सर्वच राजकीय पक्ष व संघटनांना एकमुखाने सदर योजनेच्या अमलबजावणी साठी आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजु कोन्नुर,सुहास पाटील,उमेश पाटील,दीपक पंडित,उदयसिंह निंबाळकर,विद्यासागर चराटे,प्रज्योत चौगुले,शितल मगदूम,अमित पटवा,सुषमा साळुंखे, गीता माने,संजय गुगळे,राम आडकी,अरिहंत पटवा,बाळु भंडारी,संकेत गजबी,अमोल ढवळे,राजेश बांगड,अभिजित पटवा उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा