पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान करणाऱ्या कॉंग्रेसचा इचलकरंजी भारतीय जनता पार्टी कडून जाहीर निषेध
इचलकरंजी ता.
देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व त्यांच्या आई यांच्यावर AI प्रणाली चा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने मोदीजी व त्यांच्या आईचा अपमानकारक असा व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला याचा जाहीर निषेध म्हणून, भारतीय जनता पार्टी व भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने गांधी पुतळा या ठिकाणी उग्र निदर्शन करून निषेध व्यक्त केला. व पुन्हा असे घाडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला.
या वेळी बोलताना शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी बिहार निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी AI प्रणाली चा गैरवापर करून अपमानकारक चुकीचा व्हिडीओ प्रसारित करूण हा केवळ एका मातेचा अपमान केला. हा केवळ नरेंद्र मोदी यांच्या मातेचा अवमान नसून देशातील तमाम माता भिगीनिंचा अपमान असून देशातील जनता हे खपवून घेणार नाही. कॉंग्रेस पक्षाने यापुढे विकासाच्या मुद्यावर बोलावे. जर पुन्हा अशा प्रकारे चुकीचा कृत्य केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने जशास तसे उत्तर दिले जाईल. यावेळी पूर्व शहराध्यक्ष श्रीरंग खवरे यांनी बोलताना म्हणाले कि कॉंग्रेस पक्ष नैतिकतेची पातळी ओलांडून राजकारण करत आहे. त्याला देशातील जनता योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. पश्चिम मंडलाच्या महिला अध्यक्षा सौ.सपना भिसे यांनी राहुल गांधी यांना थोडी तरी लाज असेल तर राजकारणातून सन्यास घ्यावा अन्यथा भारतातील तमाम महिला भगिनी त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. यावेळी अश्विनीताई कुबडगे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करताना म्हणाल्या राहुल गांधी हे भारत मातेला मानत नाहीत त्यांच्यावर संस्कार देखील ही विदेशी मातेच्या असून त्याचाच परिणाम त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसून येत आहे याचा देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असे गंभीर इशारा यावेळी दिला.
Advt
यावेळी पूर्व महिला अध्यक्षा सौ.सीमा कमते, सौ.रमा फाटक, सौ.अश्विनी कुबडगे, सौ.रंजना डावरे, सौ.अर्चना कुडचे, नजमा शेख, सौ.सुवर्णा लाड, श्रमती मंगल सुर्वे, नागुताई लोंढे, सौ.जयश्री शेलार, सौ.विद्या लवटे, आयेशा जमादार, सौ.सविता जगताप, सौ.अर्चना रावळ, सौ.गिरीजा हेरवाडे, सौ.सुजाता जोंग, सौ.सुप्रिया शिंदे, सौ.दिपाली लोटे, सौ.तुळसा काटकर, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन पवार, तानाजी पोवार, संजय केंगार, अरविंद शर्मा, दिपक पाटील, प्रदीप मळगे, सचिन हेरवाडे, मारुती पाथरवट, म्हाळसाकांत कवडे, भगवान बरगाले, संजय गेजगे, किरण पाटील, नामदेव सातपुते, सचिन माळी, बिलाल पटवेगार, मोहन बनसोडे, बाळासाहेब ओझा आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निषेध व्यक्त करताना भाजप कार्यकर्ते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







