इचलकरंजीत रोटरी प्रोबस क्लब तर्फे गणराया अवॉर्ड वितरण
इचलकरंजी
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने आयोजित “गणराया अवॉर्ड 2025” कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पोलीस निरीक्षक श्री. महेश चव्हाण व छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकरराव पोवार यांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळांना व घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते व अध्यक्ष सुनिल कोष्टी यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत सौ. संगीता लडगे यांनी केले, प्रास्ताविक अध्यक्ष कोष्टी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शारदा कवठे यांनी केले.
यावर्षी साई गणेश उत्सव मंडळ (सुतार मळा), सरस्वती गणेश उत्सव मंडळ (सरस्वती मार्केट) व वस्त्रनगरीचा महाराजा गणेश उत्सव मंडळ (शांतीनगर, थोरात चौक) यांना गणराया अवॉर्ड जाहीर करण्यात आले. घरगुती गौरी गणपतीत सौ. विना श्रेष्ठी यांच्या शेगाव गजानन महाराज देखाव्याला अवॉर्ड मिळाला.
मान्यवरांनी मंडळांनी सामाजिक, वैज्ञानिक व जनजागृतीपर देखावे अधिक सादर करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी शिक्षक दिनानिमित्त सदस्य शिक्षकांचा सत्कारही झाला. कार्यक्रमास रोटरी प्रोबस क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणराया अवॉर्ड 2025 चे वितरण करताना पो.नि.महेश चव्हाण,शंकर पोवार, सुनील कोष्टी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







