ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत सिंगल युज प्लास्टिक वापरावर दंडात्मक कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत सिंगल युज प्लास्टिक वापरावर दंडात्मक कारवाई

इचलकरंजी –
राज्यात सुरू असलेल्या १०० दिवस कृती आराखडा मोहिमेअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेकडून सिंगल युज प्लास्टिकविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत शहरातील चार व्यावसायिकांकडून एकूण रु. २०,००० दंड वसूल करण्यात आला.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार व उपायुक्त अशोक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने ही मोहीम राबवली. दंडीत व्यावसायिकांमध्ये देवेंद्र जैन (रु. ५,०००)अमोल काळदाते (रु. ५,०००)महावीर कोठावळे (रु. ५,०००) व रमेश चौधरी (रु. ५,०००) यांचा समावेश आहे.

या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक सुरज माळगे, विनोद जाधव, संग्राम भोरे, बबन कांबळे तसेच प्र. स्वच्छता निरीक्षक सुरज पांगरे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महानगरपालिकेने पुढील काळात सिंगल युज प्लास्टिकविरोधात आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सिंगलयुज प्लास्टिक वापरावर कारवाई करत दंड करताना महापालिका कर्मचारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा