इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची साध्या यंत्रमागधारकांसाठी २ पैसे प्रति पिक वाढ मागणी
इचलकरंजी:
दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने साध्या यंत्रमागधारकांना न्याय मिळावा म्हणून २ पैसे प्रति पिक मजुरी वाढ देण्याची मागणी इचलकरंजी पॉवरलुम क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंट असोसिएशनकडे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, १ जुलै २०२५ पासून यंत्रमाग उद्योगाच्या वीज बिलामध्ये प्रति युनिट १ ते १.२५ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर मागील काही महिन्यांत स्पेअर पार्ट (मिलस्टोअर) व कामगार मजुरीत झालेल्या वाढीमुळे कापड उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
Advt
या पार्श्वभूमीवर साध्या यंत्रमागधारकांना दिल्या जाणाऱ्या मजुरीत २ पैसे प्रति पिक वाढ आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याबाबत सर्व ट्रेडिंगधारक सदस्यांना सुचना देऊन, शुक्रवार दि. १९ सप्टेंबर २०२५ पासून ही वाढ लागू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले की, यंत्रमागधारकांनी आपल्या पेढीधारकांकडून १९ सप्टेंबरपासूनच वाढ मागावी असेही पत्रकात म्हंटले आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







