ICHMH51NEWS.IN
9921600800

स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानांतर्गत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानांतर्गत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप

इचलकरंजी–

प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाअंतर्गत “निक्षय मित्र” या उपक्रमाच्या माध्यमातून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात क्षयरुग्णांना मोफत पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश क्षयरोगावर मात करण्यासाठी आवश्यक औषधोपचाराबरोबरच संतुलित आणि पोषक आहार उपलब्ध करून देणे हा आहे. रुग्णालयाच्या क्षयरोग चिकित्सक डॉ. रुपाली भाट यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “निक्षय मित्र उपक्रमातून रुग्णांना केवळ पोषण मिळत नाही, तर समाजाकडून आधार, सहानुभूती आणि प्रेमाचा अनुभवही मिळतो.”

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ यांनी समाजातील विविध संस्था, दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन “निक्षय मित्र” म्हणून क्षयरुग्णांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले.

या वेळी एकूण ११ क्षयरुग्णांना मोफत पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन क्षयरोग चिकित्सक डॉ. रुपाली भाट व क्षयरोग विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी केले.

कार्यक्रमास रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, ए.आर.टी. विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत खारगे, रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती चारुशिल्पा येमल, सहाय्यक अधिसेविका श्रीमती सीमा कदम तसेच रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.

पोषण आहार किट वितरित करताना डॉ पोळ,डॉ सोहनी व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा