कुत्रे भुंकले… वाद वाढला… चाकू हल्ल्यात पिता-पुत्र जखमी
इचलकरंजी
: शहापूर पोलिस ठाणे हद्दीतील खोतवडी येथे कुत्रे भुंकण्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद उफाळला. हा वाद इतका वाढला की त्यात चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात फिर्यादी अक्षय भरमा गौरोजी (वय ३०) व त्यांचे वडील भरमा गौरोजी हे दोघे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता अयोध्यानगर, गल्ली नं. ६, खोतवडी येथे घडली. आरोपी श्रेयस जोशी, त्याची आई मंजिरी जोशी व त्याचे मित्र यांनी फिर्यादी अक्षय गौरोजी यांच्याशी वाद घालत मारहाण केली. वादाच्या दरम्यान मंजिरी जोशी हिने फिर्यादीची कॉलर पकडून थप्पड मारली आणि इतरांना “याला जिवंत सोडू नका” असे उद्गार काढले. त्यानंतर श्रेयस जोशीने हातातील चाकूने फिर्यादीवर हल्ला करून बरगडीखाली वार केला, तर सोडविण्यास आलेल्या वडिलांनाही त्याच्या मित्राने चाकूने भोसकले.
या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोसई दरेकर करत आहेत. दाखल अंमलदार सहायक फौजदार मोहिते आहेत.
दरम्यान, सदर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







