ICHMH51NEWS.IN
9921600800

दत्ताजीराव कदम महाविद्यालयात “बिग बटरफ्लाय मंथ” उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दत्ताजीराव कदम महाविद्यालयात “बिग बटरफ्लाय मंथ” उत्साहात साजरा

इचलकरंजी :

दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय फुलपाखरू जागरूकता महिना निमित्त “Role of Butterfly in Environment” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचे स्वागत प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. के. वाघमारे यांनी केले. प्रमुख अतिथी डॉ. संतोष उमराणे यांनी फुलपाखरांची विविधता, जीवनचक्रातील टप्पे, अन्नसाखळीतले स्थान तसेच वाढते नागरीकरण आणि कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे होणारे नुकसान यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी फुलपाखरांची ओळख करून स्थानिक पातळीवर संवर्धनासाठी बटरफ्लाय गार्डन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. खाडे यांनी भूषविले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनुजा विभुते व प्रा. सोनाली हंकारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एन. एच. शेख यांनी मानले.

या उपक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. फुलपाखरांच्या आकर्षक रंगसंगतीत पर्यावरणीय भूमिकेचे महत्त्व समजावून घेत त्यांच्या संरक्षणाची गरज अधोरेखित करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक किशोर मदने व विशाल कलकुटकी यांचे विशेष सहकार्य लाभले.

मार्गदर्शन करताना प्राचार्य एस के खाडे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा