इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत.
इचलकरंजी
कुरुंदवाड येथील वीज वितरण कंपनीकडून मजरेवाडी परिसरातील वीज पुरवठा खंडित होणार असल्याने मजरेवाडी येथील पाणी उपसा बंद राहणार आहे. तसेच पंचगंगा पाणीपुरवठा योजनेच्या दाबनलिकेला डेक्कन जॅकवेलजवळ गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कारणांमुळे इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर टारे कॉर्नर ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान ७५० मिमी व्यासाच्या पाइपलाईन जोडणीचे कामही करण्यात येणार असून हे काम मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळपर्यंत पूर्ण होणार आहे.
दरम्यान शहरवासीयांना अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







