कन्या महाविद्यालयात ‘बँकिंग क्षेत्रातील करियर संधी’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
दुसऱ्या सत्रातील मार्गदर्शक प्रा. अभिषेक चौगले (राज्यशास्त्र विभागप्रमुख, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज) यांनी बँका तसेच इतर वित्तीय संस्थांमध्ये विविध पदावरील अधिकारी व कर्मचारी यांची निवड प्रक्रिया, पात्रता, परीक्षेचे स्वरूप व या परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी प्रथम सत्रासाठी डॉ. विठ्ठल नाईक (हिंदी विभागप्रमुख व अग्रणी महाविद्यालय समिती प्रमुख) सत्र अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर द्वितीय सत्रासाठी प्रा. प्रियांका साळोखे (कॉमर्स विभागप्रमुख) सत्र अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकिता बडे व प्रा. शाहीन फकीर यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्रा.सुधाकर इंडी, प्रा. उदय कांबळे, प्रा. शिवशंकर रत्नपारखे, डॉ. धीरज शिंदे, डॉ. अशोक बोगुलवार, प्रा. प्रिया सुतार, प्रा. नागरथवार, तसेच चंद्राबाई शेंदुरे कॉलेज,हुपरी, राजर्षी शाहू आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज रुकडी, अण्णासाहेब डांगे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज हातकणंगले, डी के एस सी कॉलेज इचलकरंजी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज पेठ वडगाव, विजयसिंह यादव कॉलेज पेठवडगाव, व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी येथील प्राध्यापक व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
प्रा. संभाजी निकम (सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र) यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
मार्गदर्शन करताना कैलास पाटील
—
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







