डीकेटीईस एआयसीटीई दिल्ली यांचेकडून ‘टीवीनिंग प्रोग्रॅमसविथ फॉरेन युनिर्व्हर्सीटीज‘ सुरु करण्यास मान्यता
इचलकरंजी
डीकेटीई संस्था ही शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था असून, शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक दर्जा मिळविण्याच्या दिशेने ती ठाम पावले टाकत आहे. याच दृष्टीकोनातून डीकेटीईच्या टेक्स्टाईल आणि इंजिनिअरींग इन्स्टिटयूटला नुकतीच एआयसीटीई, दिल्ली यांच्याकडून टीवीनिंग प्रोग्रॅमस विथ फॉरेन युनिर्व्हर्सीटीजस या कोर्ससाठी अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. डीकेटीई मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील असलेले गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार यामुळे डीकेटीईचे विदयार्थी जगभर कार्यरत आहेत व संस्थेबरोबरच इचलकरंजी आणि संपूर्ण भारताचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखीत करीत आहेत. या टीवीनिंग प्रोग्रममुळे याला नव्याने पंख मिळणार आहेत अशी भावना संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी पत्रकार परिषदेत .
यावेळी त्यांनी सांगितले की, डीकेटीईचे विविध देशांतील नामांकित ३० परदेशी विद्यापीठांशी शैक्षणिक करार असल्यामुळे या कराराअंतर्गत क्रेडिट ट्रान्सफर अंतर्गत याअधिही डीकेटीईचे विद्यार्थी एक सेमिस्टर परदेशात शिक्षण घेत आहेत. या टीवीनिंग प्रोग्रॅमचा उददेश विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणसंस्था यांच्यासोबत शिक्षण, संशोधनाची संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. टीवीनिंग प्रोग्रॅम मध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी पहिले दोन वर्षे डीकेटीई मध्ये शिकतील आणि पुढील दोन वर्षे परदेशातील संबंधीत विद्यापीठात शिक्षण घेतील. यामुळे विद्यार्थ्यांना परदेशातील प्रगत तंत्रज्ञान, संशोधन आणि अध्ययन पध्दतींचा अनुभव घेता येईल. भारत आणि परदेशातील विद्यापीठांकडून मान्यताप्राप्त दुहेरी पदवी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये नोकरीच्या उत्तम संधी प्राप्त होणार आहेत. परदेशातील विविध संस्कृतींचा अनुभव घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
या प्रोग्रॅमअंतर्गत युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एन्जेलिस, अमेरिका, युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हरसाईड, अमेरिका, नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिर्व्हसिटी, अमेरिका, इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट, जर्मनी, हॉफ युनिर्व्हर्सिटी, जर्मनी, आरडब्ल्यूएच ऍकेन युनिर्व्हसिटी, जर्मनी, सॅक्सॉन युनिर्व्हसिटी, नेदरलँड, डब्लीन युनिर्व्हसिटी, आयरलँड, या विख्यात संस्थाचा समावेश आहे. या प्रोग्रॅमअंतर्गत परदेशात शिक्षण घेण्याचा खर्च कमी येणार असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना त्यांचे परदेशी शिक्षण घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी डीकेटीई संस्था व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन संस्थेच्या डायरेक्टर डॉ एल.एस. अडमुठे यांनी केले. सदर टीवीनिंग प्रोग्रॅम साठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर परिषदेस डायरेक्टर डॉ एल.एस.अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800