शिवाजीनगर पोलिसांची गुटखा विरोधात कारवाई — ४३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल जप्त केला. कारवाई वखार भागातील पूजा किराणा दुकानात करण्यात आली.याबाबत आरोपी अशोककुमार रामनिवास तोष्णीवाल (वय ५४, रा. वखार भाग, इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी रजनीगंधा, बाबा, विमल, पान बहार आदी विविध ब्रँडच्या गुटखा व सुगंधी सुपारीच्या एकूण ४,३९० रुपये किंमतीच्या पुड्या जप्त केल्या. तपास म.पो. उपनिरीक्षक उर्मिला खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. .
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







