इचलकरंजी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर — कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण
इचलकरंजी –
इचलकरंजी महानगरपालिकेत आज आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिवाळी बोनस संदर्भात बैठक पार पडली. चर्चेनंतर सर्वानुमते यावर्षी कर्मचाऱ्यांना २०,००० रुपयांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर आयुक्त पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त सौ. सुषमा शिंदे, सहायक आयुक्त विकास कोळपे, रोशनी गोडे, नगररचनाकार प्रशांत भोसले, तसेच कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष के. के. कांबळे, कार्याध्यक्ष शिवाजी जगताप, सचिव हरी माळी, समन्वयक ए. बी. पाटील, वाल्मिकी मेहतर समाजाचे अध्यक्ष राजेश रजपूते, सल्लागार नैवशाद जावळे, धनंजय पळसुळे, संजय शेटे, चंद्रकांत कोठावळे, संपत तांबिरे, गणेश शिंदे, बाळासाहेब तोरस्कर, श्रीकांत पाटील, सुनील बेलेकर, संजय कांबळे, शितल पाटील, विजय पाटील, शंकर अगसर, सचिन खोंद्रे, संतोष पासोबा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सानुग्रह अनुदानाची मागणी मान्य झाल्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांचे अभिनंदन करताना कर्मचारी व अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







