कन्या दिन सप्ताहानिमित्त स्त्रीशक्तीचा गौरव: इचलकरंजीत विजेत्यांचा सन्मान आणि ‘नवदुर्गा’ पुरस्कार वितरण
इचलकरंजी –
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ पश्चिम मंडल तर्फे नवरात्रि, कन्या दिन सप्ताह आणि स्त्रीशक्तीचा जागर हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित मुलीविषयी छायाचित्र आणि भावार्थ काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तसेच समाजसेवा आणि मानवी कल्याणासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा श्री सिद्ध हनुमान मंदिर, हत्ती चौक येथे पार पडला.
सदर उपक्रम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे, आमदार डॉ.राहुलजी आवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षक अशोक दास आणि भागवत पंडित यांनी विजेत्यांची घोषणा केली. प्रथम क्रमांक स्मिता जगताप यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक मिनल लिपारे आणि अमोल कित्तुरे यांनी विभागून मिळवला, तर तृतीय क्रमांक प्रितिका कबाडे आणि कांचन भद्रन्नावर यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ पार्वती आवटी, अर्चना परदेशी, श्वेता त्रिभुवन आणि वंदना सौंदती यांचा गौरव करण्यात आला.
‘नवदुर्गा’ पुरस्कारांतर्गत कांचनमाला भाट, स्मिता जगताप, सुषमा मिणेकर, स्मिता पाटील, निलीमा देशपांडे, आरती मांगलेकर, नेहा ठाणेकर, सोनाली हणबर आणि मोहिनी जगताप,यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Advt
कार्यक्रमाला मार्गदर्शक आणि प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा इचलकरंजी भाजपा पश्चिम मंडल शहराध्यक्ष शशिकांत मोहिते, पश्चिम महिला आघाडी अध्यक्षा सौ.सपना भिसे, पूर्व मंडल महिला आघाडी अध्यक्षा सौ.सिमा कमते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर वसंतराव सपकाळे, सुभाष कुराडे, दत्ता टोणपे, उमेश लाड, दीपक होगाडे, प्रमोद इदाते, नेताजी बिरंजे, पार्वती आवटी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन इचलकरंजी भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पश्चिम मंडल अध्यक्ष पद्माकर कुरकुटे, उपाध्यक्ष उदय होगाडे, सरचिटणीस आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख मुकुंद तारळेकर,कोअर कमिटी सदस्य प्रमुख धनंजय सातपुते, प्रमोद इदाते, दिपक सारडा, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवदुर्गा पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







