पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे विक्रेत्यांना दिवाळी साहित्याचे वाटप
इचलकरंजी:
येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना दिवाळी सणानिमित्त साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष शिवगोंडा खोत यांच्या हस्ते हे वाटप करून विक्रेत्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना शिवगोंडा खोत म्हणाले, “गेल्या पंधरा वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या घरात दिवाळी साहित्य वाटप करताना समाधान लाभत आहे. मात्र राज्य सरकारने देखील आता वृत्तपत्र विक्रेत्यांची दिवाळी गोड करण्याची वेळ आली आहे. मागील दिवाळीपूर्वी सरकारने विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ जाहीर केले होते, तेव्हा सर्व विक्रेते आनंदी झाले होते. मात्र त्यानंतर मंडळ कार्यान्वित करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे आजही राज्यातील विक्रेते अडचणीत आहेत. सरकारने हे मंडळ तातडीने कार्यान्वित करावे यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्याची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
Advt
संघटनेचे सचिव अण्णा गुंडे यांनी सांगितले की, “संघटनेचे सभासद बंधू वर्षभर पेपरमध्ये प्रामाणिकपणे जाहिरात घालतात, त्यामुळेच संघटना पंधरा वर्षांपासून दिवाळी साहित्याचे वाटप सातत्याने करत आहे.” दिवाळी साहित्यात साखर, रवा, मैदा, हरभरा डाळ, तेल, सुवासिक तेल, मोती साबण, उटणे, पॉंड्स पावडर आणि पेपरची पिशवी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला संघटनेचे संचालक अमर मुसडे, महेश बावळे, नारायण शिंदे, कृष्णा हजारे, महादेव चिखलकर, विशाल परीट, सुरेश चौगुले, विजय वाइंगडे, भालचंद्र कांबळे, शिवानंद रावळ यांच्यासह विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेत्याना दिवाळी साहित्य वितरण करण्यात आले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







