ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिर मध्ये वाचन प्रेरणा दिन आणि दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ.     ।

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिर मध्ये वाचन प्रेरणा दिन आणि दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ.     

इचलकरंजी:

 भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी . जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.  आपटे वाचन मंदिर येथे बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, इचलकरंजी आणि ना. बा. निवृत्त शिक्षक कर्मचारी परिवार, इचलकरंजी या दोन संस्थांमधील जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.          Advt
 कार्यक्रमाचे स्वागत — प्रास्ताविक अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले.  ज्येष्ठ नागरिकांचा परिचय कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी करून दिला. त्यावेळी दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ ही ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा व जाहिरातदार श्री. संतोष पाटील आणि श्री. जितेश कुमार चौहान यांचा सत्कार ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. मधुकर खटावकर, श्री. नरसिंह वझे, श्री. अशोक लोले आणि श्री संतोष पाटील यांनी आपल्या मनोगतातून ग्रंथालयाबद्दलचे गौरव उद्गार काढले. आभार प्रदर्शन सहकार्य डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी केले. कार्यक्रमास संचालक श्री संजय सातपुते, कु. माया कुलकर्णी, ना. बा. निवृत्त कर्मचारी परिवाराचे अध्यक्ष पी. आय. कोरे , ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनी, जाहिरातीचे मान्यवर प्रायोजक आणि वाचक उपस्थित होते.
दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ करताना अध्यक्ष सुषमा दातार,मोहन पुजारी व ज्येष्ठ नागरिक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा