पानपट्टी बाहेर मारामारी तिघांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी:
शाहू कॉर्नर परिसरात पानपट्टीजवळ उभ्या असलेल्या तरुणास दुसऱ्या सोबत का फिरतोस या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच दगड डोक्यात मारून दुखापत केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी यांच्या इचलकरंजी पोलीस ठाण्यात फिर्यादी रोहन मारुती भांगे (वय २६, रा. साजणी शाहूनगर) यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा नोंद झाला आहे
Advt
शाहु कॉर्नर येथील प्लेयर्स पानशॉप येथे फिर्यादी गेले असता आरोपी आदित्य आवळे (रा. कामगार चाळ) व दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर तिघांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी आदित्य आवळे याने दगड डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सहा. फौजदार ननवरे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







