मैत्री फाउंडेशन व संकल्प ग्रुप ( पदमप्रभू जैन मंदिर) च्या वतीने दीपावली निमित्त ड्रेस वाटप
इचलकरंजी
दीपावलीच्या निमित्त सर्व घरातील मुला-मुलींना नवीन कपडे व विविध वस्तू घेतल्या जातात परंतु अनाथ आश्रमातील मुलांना मात्र निभवावे लागते. मैत्री फाऊंडेशन व संकल्प ग्रुप यांनी यावर्षी अनाथ आश्रमातील मुलांना दीपावलीचे ड्रेस वितरण करण्याचा संकल्प करत तारदाळ मधील मायेची सावली या अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे ड्रेस वाटप करण्यात आले. याआधी मैत्री फाउंडेशन च्या वतीने गरजू कुटुंबांना दीपावलीचे किट वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
Advt
गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये मैत्री फाऊंडेशनचे सर्व सदस्य हिरीरीने सहभागी होतात. या कार्यक्रमाप्रसंगीमैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड, महिला प्रमुख वहिदा नेजकर व अशोक खोत सर उपस्थित होते. अनाथाश्रम संचालिका सौ प्रतिभा पैलवान व संकल्प ग्रुपचे अध्यक्ष सौ टीना रावका , उपाध्यक्ष सौ नेहा बाकलीवाल, सदस्या सौ रेखा बडजात्या, सौ प्रगती बाकलीवाल, सो मोना बडजात्या सौ बबिता कासलीवाल इत्यादी सर्व सदस्या उपस्थित होत्या. संकल्प ग्रुपच्या या कार्यक्रमाचे विशेष प्रेरणास्थान म्हणून डॉक्टर सौ सुमन पाटणी यांनी पडद्यामागे राहून काम केले. संकल्प ग्रुप व मैत्री फाऊंडेशनच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
ड्रेस वितरित करताना चंद्रप्रकाश छाजेड,टिना रांवका,प्रतिभा पैलवान
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







