आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल दायित्व कार्यक्रमात नुतन पदाधिकाऱ्यांची घोषणा
इचलकरंजी –
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांच्या महिला कक्ष व ओजस्विनी वाहिनीच्या वतीने दायित्व कार्यक्रम श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पंचवटी टॉकीज येथे पार पडला, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष किशोर मोदी होते.
प्रमुख उपस्थितीत सुनिलजी घनवट (हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र व छत्तीसगड प्रमुख), विजय पाटील (माजी जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद), जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख संतोष हात्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, सौ. ललिता ठाणेकर (राष्ट्रीय महिला कक्ष उपाध्यक्षा) व सौ. अंजली पोळ (ओजस्विनी वाहिनी जिल्हा अध्यक्षा) उपस्थित होते.
Advt
सुनिलजी घनवट यांनी “देव, देश आणि धर्मासाठी कार्यकर्त्यांनी मंदिरातील आरतीत नियमित सहभाग घ्यावा, हिंदू संस्कृती ही श्रेष्ठ आहे” असे सांगितले. विजय पाटील यांनी संघटनेचे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात जिल्हा व शहर पातळीवरील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. अशोक पुरोहित (जिल्हा उपाध्यक्ष), अनिकेत तानुगडे (राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा अध्यक्ष), महेश कोरवी व तेजस राणे (गोरक्षा प्रमुख), सचिन यळरूटे (शहर अध्यक्ष), कांदबरी लाहीगुडे (ओजस्विनी वाहिनी जिल्हा अध्यक्षा) यांच्यासह विविध विभागांतील अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटनेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शन करताना सुनील घनवट
नूतन पदाधिकरी यांचे अभिनंदन करतानाचा क्षण
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








