ICHMH51NEWS.IN
9921600800

निराधार व दिव्यांगांच्या जीवनात प्रकाश उजळून महाजन यांनी खर्‍या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित केला — सुरेश हाळवणकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निराधार व दिव्यांगांच्या जीवनात प्रकाश उजळून महाजन यांनी खर्‍या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित केला — सुरेश हाळवणकर

इचलकरंजी – “आपल्याकडे जे काही आहे, त्यातून गरजू, निराधार व दिव्यांगांच्या जीवनात प्रकाश आणि आनंद आणणे हेच खरे दिवाळीचे उपकार आहे. माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन आणि त्यांचा परिवार याच कार्यातून समाजासाठी आदर्श ठरला आहे,” असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले.

साईप्रसाद ग्रुप यांच्या वतीने दिव्यांग व निराधार बांधवांसोबत दिवाळी साजरी करत फराळ साहित्याचे वाटप इचलकरंजी येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना हाळवणकर म्हणाले, “महाजन यांच्या कार्यामुळे समाजात संवेदनशीलतेचा संदेश जातो. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. समाजहितासाठी सर्वांनी मिळून त्यांना योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम करूया.”

Advt

कार्यक्रमात १२०० निराधार व दिव्यांगांना फराळ साहित्य वाटप करण्यात आले. प्रारंभी विनय महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना सुनील महाजन यांनी सांगितले, “गत २३ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहून माझ्या दिवाळीचा आनंदही द्विगुणित होतो. शेवटच्या श्वासापर्यंत हा उपक्रम अखंड सुरू ठेवणार आहे. समाजातील दानशूर लोक जर आपल्या आसपासच्या गरजू लोकांच्या घरात दिवाळी साजरी करतात, तर त्यांचा आनंद अविस्मरणीय ठरतो.”

या वेळी मदन कारंडे, सतीश डाळ्या, सागर चाळके, तानाजी पोवार, रवी रजपुते, विठ्ठल चोपडे, प्रविण खामकर, मच्छिंद्र नगारे, अशोक पाटणी, मनोज साळुंखे, मनोज हिंगमिरे, अरविंद शर्मा,मंगेश कांबुरे, भरत जोशी, विजय सारडा आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवाळी आणि वाढदिवस एकत्र साजरा

२३ ऑक्टोबर रोजी सुनील महाजन यांचा वाढदिवस साजरा होतो. यंदा वाढदिवस दिवाळीच्या सणातच आल्याने त्यांनी या वर्षी दिवाळी आणि वाढदिवस एकत्र साजरे करून आनंद द्विगुणित केला. महाजन समर्थकांनी मोठा केक आणून दिव्यांग व निराधारांच्या उपस्थितीत कापला. उपस्थित लाभार्थ्यांनी दिवे आणि आकाशकंदील उंचावून दिवाळीसह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सौ. विजया महाजन यांनी दिव्यांग मुलांना स्वतःच्या हातांनी मिठाई व फराळ भरवून त्यांचा आनंद द्विगुणित केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सुनील महाजन यांच्या मातोश्री शारदा महाजन देखील उपस्थित होत्या.

फराळ वाटप करताना माजी आमदार सुरेशराव हाळवणकर,मदन कारंडे,सतीश डाळ्या,सागर चाळके,विठ्ठल चोपडे,सुनील महाजन, विनय महाजन

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा